
1. शैलीमीमांसा या ग्रंथाचे लेखक कोण ?
(1) लीला गोनिलकर
(2) रमेश धोंगडे
(3) अशोक केळकर
(4) दिलीप धोंडगे
2. ऐतिहासिक भाषाशास्त्राची मांडणी कोणी केली ?
(1) सोस्यूर
(2) चॉम्स्की
(3) विल्यम जोन्स
(4) मॅक्सम्यूलर
3. शब्दांच्या जाती किती आहेत ?
(1) सात
(2) आठ
(3) सहा
(4) दहा
4. मराठीतील कोणती विभक्ती अत्यंत वादग्रस्त मानली जाते ?
(1) पंचमी
(2) तृतीय
(3) षष्ठी
(4) चतुर्थी
5. संमतविचार हा भाषाविचार कोणी मांडला ?
(1) रा. चि. ढेरे
(2) शं. बा. जोशी
(3) रमेश वरखेडे
(4) विश्वनाथ खैरे
6. 'माका', 'तुका' हे शब्दप्रयोग कोणत्या बोलीभाषेत वापरले जातात ?
(1) वऱ्हाडी
(2) खानदेशी
(3) कोकणी
(4) मराठवाडी
7. शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण ?
(1) अरविंद मंगळूरकर
(2) मो. के. दामले
(3) सुबोध भावे
(4) मो. रा. वाळिंबे
8. 'समाजभाषाविज्ञान प्रमुख संकल्पना' या ग्रंथाचे लेखक कोण ?
(1) दिलीप धोंडगे
(2) रमेश वरखेडे
(3) रमेश धोंडगे
(4) अशोक केळकर
9. 'अंगी' बोली कोणत्या प्रदेशात बोलली जाते ?
(1) मराठवाडा
(2) विदर्भ
(3) खानदेश
(4) कोकण
10. मराठीवर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे ?
(1) आसामी
(2) गुजराती
(3) कन्नड
(4) तमीळ
11. पहिल्या मराठी साहित्य संमेलन (१८७८) आयोजनात कोणी पुढाकार घेतला होता ?
(1) महात्मा फुले
(2) श्री. म. माटे
(3) म. गो. रानडे
(4) गो. ग. आगरकर
12. 'लळित' हा कलाप्रकार कोणत्या प्रदेशात अस्तित्वात आहे ?
(1) मराठवाडा
(2) कोकण
(3) विदर्भ
(4) प. महाराष्ट्र
13. महात्मा फुले यांच्या विचारातून कोणती वाङ्मयीन परंपरा निर्माण झाली ?
(1) आंबेडकरी जलसे
(2) सत्यशोधकी
(3) कामगार साहित्य
(4) आदिवासी
14. संज्ञाप्रवाही कादंबरी कोणी लिहिली ?
(1) जयवंत दळवी
(2) बाबा कदम
(3) बा. सी. मठेकर
(4) सदानंद देशमुख
15. नियोजित १७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?
(1) प्रवीण दवणे
(2) अरुणा ढेरे
(3) रवींद्र शोभणे
(4) अक्षय काळे
16. पुढीलपैकी कोणत्या प्रकाशसंस्थेने प्रकाशन व्यवहारात भरीव कार्य केले आहे ?
(1) अक्षरणेरणी
(2) कैलास
(3) पॉप्युलर
(4) मंजुक
17. कीर्तनपरंपरेच्या आद्य प्रवर्तकाचा मान कोणाला दिला जातो?
(1) एकनाथ
(2) नामदेव
(3) निळोबा
(4) ज्ञानदेव
18. 'संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती' या ग्रंथाचे लेखक कोण ?
(1) शं. गो. तुळपुळे
(2) द. ना. पोतदार
(3) र. बा. मंचरकर
(4) गं. वा. सरदार
19. केवळ समीक्षा या विषयाला वाहिलेले नियतकालिक कोणते ?
(1) रूची
(2) नवभारत
(3) आलोचना
(4) संशोधन पत्रिका
20. पुढीलपैकी देवनागरी लिपीचे अभ्यासक कोण ते लिहा ?
(1) रामदास भटकळ
(2) बापूराव नाईक
(3) दीपक घारे
(4) श्री. पु. भागवत
21. तौतनिक साहित्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
(1) निशिकांत मिरजकर
(2) आनंद पाटील
(3) र. बा. मंचरकर
(4) भालचंद्र नेमाडे
22. विश्वसाहित्य ही संज्ञा पहिल्यांदा कोणी वापरली ?
(1) प्लेटो
(2) अॅरिस्टॉटल
(3) गटे
(4) कांट
23. 'मोटना बटाव' या वगनारयाच्या लेखकाचे नाव काय आहे ?
(1) उमा बापू सावळजकर
(2) दादु इंदुरीकर
(3) बसंत सबनीस
(4) तुकाराम खेडकर
24. 'लोकनागर' रंगभूमी' ही संकल्पना कोणी वापरली आहे ?
(1) श्यामला बनारसे
(2) तारा भवाळकर
(3) विजया राजाध्दक्ष
(4) आशा बगे
25. देवलांनी शेक्सापिअरच्या ऑथेल्लोचे केलेले रूपांतर ?
(1) मानापमान
(2) अविभारक
(3) झुंजारराव
(4) भाऊबंदकी
26. एका भाषेतील मजकूर अन्य भाषेत उतरवण्याची प्रक्रिया म्हणजे ?
(1) माध्यमांतर
(2) भाषांतर
(3) रूपांतर
(4) विस्तार
27. 'भाषांतरीत वस्तूचे मूळचे सर्व गुण भाषांतरात असायला हवेत' ही भूमिका कोणी घेतली होती ?
(1) म. गो. रानडे
(2) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(3) लोकहितवादी
(4) गोपाळ गणेश आगरकर
28. वाङ्यमीन आदानप्रदानाचा सर्वात प्रमुख आविष्कार म्हणजे
(1) वाङमयीन प्रभाव होय
(2) साहित्य संस्कार
(3) साहित्य समीक्षा
(4) साहित्यिक क्षमता
29. 'इतर पक्ष्यांची' सुंदर पिसे स्वतःच्या 'पिसाऱ्यात' खुपसून 'मिरवणारा' 'डोमकावळा' असे कोणाचे वर्णन केले आहे ?
(1) शेक्सपिअर
(2) इब्सेन
(3) शॉ
(4) ब्रेख्त
30. 'बेघर' या कादंबरीवर आधारीत असलेल्या चित्रपटाचे नाव
(1) नटरंग
(2) अत्याचार
(3) उंबरठा
(4) सिंहासन
31. दलित जाणिवेतून दलित जीवनाचे भेदक दर्शन घडविणारे साहित्य हे दलित साहित्य अशी व्याख्या कोणी केली ?
(1) गो. म. कुलकर्णी
(2) बाळकृष्ण कवठेकर
(3) भालचंद्र फडके
(4) केशव मेश्राम
32. सामाजिक समतेच्या चळवळीतून कोणता साहित्य प्रवाह निर्माण झाला ?
(1) ग्रामीण
(2) दलित
(3) विज्ञान
(4) प्रादेशिक
33. 'गोलपिठा' या कवितासंग्रहाचे कवी कोण ?
(1) दया पवार
(2) नामदेव ढसाळ
(3) नारायण सूर्वे
(4) बामन निंबाळकर
34. लोकसाहित्यामध्ये शेतीची अधिष्ठात्री देवता म्हणून कोणाला संबोधले जाते ?
(1) सीता
(2) द्रौपदी
(3) गांधारी
(4) कौशल्या
35. गोमंतथातील एक प्रसिद्ध लोकगीत प्रकार कोणता ?
(1) गौळण
(2) धालो
(3) लावणी
(4) पोवाडा
36. 'ताक-दूध दोन्ही बराबर' या सांकितिक भाषेतील वाक्याचा अर्थ काय ?
(1) ताक व दूध समप्रमाणात आहेत.
(2) भाऊ-भाऊ बरोबर आहेत.
(3) मुले-मुली यांची संख्या बरोबर आहे
(4) दही, दूध, ताक, तूप यांची रेलचेल आहे.
37. पुढीलपैकी कोण ग्रामीण कलाकार नाही ?
(1) व्यंकटेश माडगूळकर
(2) चासता सागर
(3) आनंद यादव
(4) गंगाधर गाडगीळ
38. पुढीलपैकी विनोदी ग्रामीण कथाकार कोण?
(1) लक्ष्मणराव सरदेसाई
(2) द. मा. मिरासदार
(3) बाबा पाटील
(4) रा.रं. बोराडे
39. पहिली ग्रामीण कादंबरी कोणती ?
(1) गावगुंड
(2) बळीबा पाटील
(3) यमुना पर्यटन
(4) पिराजी पाटील
40. पुढीलपैकी कोणत्या कथेने ग्रामीण कथेचा पाया घातला ?
(1) नागीण
(2) एथूर
(3) काळ तर मोठा कठीण आला
(4) गुरवाचे खत
41. मध्ययुगीन मराठी वाङ्मयेतिहासाविषयी कोणी लेखन केले आहे ?
(1) र. बा. मॅचरकर
(2) व. दि. कुलकर्णी
(3) गंगाधर मोरजे
(4) रा. ग. जाधव
42. इतिहास म्हणजे पुराव्यांनी निश्चित केलेल्या लक्ष्यांचा संग्रह हे विधान कोणाचे ?
(1) अर्नाल्ड जे टॉयनबी
(2) अ. ना. देशपांडे
(3) वि. का. राजवाडे
(4) इ. एच्. कार
43. मराठी नाटकांची गंगोत्री कोणत्या भूमीस मानले जाते?
(1) कर्नाटक
(2) उत्तर प्रदेश
(3) मध्य प्रदेश
(4) तंजावर
44. 'कवितेचा शोध' या ग्रंथाचे लेखक कोण ?
(1) रा. भा. पाटणकर
(2) वसंत पाटणकर
(3) मिलिंद मालशे
(4) सुधीर पटवर्धन
45. जीवनवाद - कलावाद हा वाङ्मयीन वाद हा कोणत्या साहित्यिकांत झडला ?
(1) अगे-खांडेकर
(2) खांडेकर-फडके
(3) फडके-काणेकर
(4) नेमाडे-शिखाडकर
46. इतिहास लेखनात भाषा कशी असावी ?
(1) अलंकारिक
(2) काव्यमय
(3) वस्तुनिष्ठ
(4) संवादात्मक
47. पुढील जोडया योग्य पद्धतीने जुळवा
(a) हरीभाऊ आपटे
(b) नायमाधव
(c) वा.म. जोशी
(d) विश्राम बेडेकार
--------------
(i) रणांगण
(ii) आश्रमहरिणी
(iii) सावळया तांडेल
(iv) मधली स्थिती
(1) (a-iii); (b-ii); (c-i); (d-iv)
(2) (a-iv); (b-iii); (c-ii); (d-i)
(3) (a-i); (b-iii); (c-ii); (d-iv)
(4) (a-ii); (b-i); (c-iv); (d-iii)
48. 'संगीत शाकुंतल' आणि 'संगीत सौभद्र' या नाटकांचे नाटककार कोण ?
(1) गोविंद बल्लाळ देवल
(2) आण्णासाहेब किर्लोस्कर
(3) श्रीपाद कृष्ण कोलहटकर
(4) कृष्णजी प्रभाकर खाडिलकर
49. गंगाधर गाडगीळांनी 'नवकवितेचे जनक' असे कोणाया म्हंटले ?
(1) केशवसूत
(2) बा. सी. मर्देकर
(3) गोविंदाग्रज
(4) कुसुमाग्रजस्पष्टीकरण : गंगाधर गाडगीळांनी बा. सी. मर्देकरांना 'नवकवितेचे जनक' असे संबोधले आहे, कारण मर्देकरांनी मराठी कवितेत आधुनिकता आणि नवनवीन विचार आणले.
50. लिंगनिरपेक्ष वृत्तीने वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मयकृती समजून घेव्यासाठी कोणता दृष्टिकोण आवश्यक असतो ?
(1) अभिजातवादी
(2) अस्तित्ववादी
(3) स्त्रीवादी
(4) आदर्शवादीस्पष्टीकरण : लिंगनिरपेक्ष वृत्तीने वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मयकृती समजून घेण्यासाठी स्त्रीवादी (Feminist) दृष्टिकोन आवश्यक असतो, कारण हा दृष्टिकोन लिंगभाव आणि सत्तेच्या संबंधांवर लक्ष केंद्रित करतो.
51. सार्वजनिक सत्यधर्मा ची स्थापना कोणी केली ?
(1) सावित्रीबाई फुले
(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(3) म. ज्योतिबा फुले
(4) म. गांधीस्पष्टीकरण : सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, ज्याचा उद्देश सामाजिक समानता आणि मानवी हक्कांचे समर्थन करणे हा होता.
52. 'हे परम अमंगल अशा हिंदुधर्मा', अशी हिंदू धर्मावर टीका कोणी केली
(1) गोपाळ गणेश आगरकर
(2) म. फुले
(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(4) शाहू महाराज
स्पष्टीकरण : 'हे परम अमंगल अशा हिंदुधर्मा' अशी टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, त्यांनी हिंदू धर्मातील जातीय भेदभावावर आणि असमानतेवर तीव्र आक्षेप घेतले होते.53. पहिले मुस्लिम मराठी साहित्य संमेलन यावर्षी भरले
(1) 1960
(2) 1990
(3) 1975
(4) 1965
54. हुंडाप्रतिबंधक कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला ?
(1) 1817
(2) 1891
(3) 1961
(4) 1976
55. साहित्यवाचारांची जडणघडण करण्याच्या दृष्टीने 1874 साली यांनी 'निबंधमाला' हे नियतकालिक सुरु केले.
(1) विष्णुबुवा ब्रह्मचारी
(2) कृष्णशास्त्री चिपळूणकर
(3) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(4) गोपाळ गणेश आभरकर
56. नारायण नरसिंह फडणीस यांनी 1887 मध्ये जळगावहून केवळ काव्याला वाहिलेले कोणते नियतकालिक सुरु केले.
(1) काव्यरत्नावली
(2) काव्यमिमांसा
(3) सुधारक
(4) काळ
57. या ग्रंथाला नाथपंथियांनी प्रमाणग्रंथ म्हणून मान्यता दिली आहे.
(1) विवेकसिंधु
(2) गाभासप्तशती
(3) स्मृतीस्थळ
(4) अमृतानुभव
58. लघुनियतकालिकांचा कालखंड कोणता ?
(1) 1818/1885
(2) 1920 ते 1960
(3) 1960 ते 1975
(4) 1975 ते 2000
59. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथात महानुभावांचे तत्वज्ञान सांगितले आहे.
(1) सप्तप्रकरणात्मक चरित्र
(2) सिद्धांतसूत्रपाठ
(3) अमृतानुभव
(4) गुरुचरित्र
60. महाडच्या चवहार तळयाचा सत्याग्रह ------ या साली झाला.
(1) 1920
(2) 1927
(3) 1956
(4) 1935
61. "स्त्री ही स्त्री म्हणून जभाला येत नाही ती घडवली जाते" हे विधान कोणाचे आहे ?
(1) ताराबाई शिंदे
(2) सीमॉन दी बोव्हा
(3) व्हर्जिनिया वुल्फ
(4) मालती बेडेकर
62. साहित्यप्रवाह व लेखकांच्या जोडया जुळवा.
(a) बालसाहित्य
(b) महानगरीय साहित्य
(c) विज्ञान साहित्य
(d) प्रादेशिक साहित्य
--------------------
(i) जयंत नारळीकर
(ii) साने गुरुजी
(iii) श्री. ना. पेंडसे
(iv) भाऊ पाध्ये
(1) (a-iii), (b-iv), (c-ii), (d-i)
(2) (a-iv), (b-iii), (c-i), (d-ii)
(3) (a-iv), (b-ii), (c-i), (d-iii)
(4) (a-ii), (b-iv), (c-i), (d-iii)
63. 1915 साली लिहिलेली 'तारेचे रहस्य' ही मराठीतील पहिली मानलेली विज्ञानकथा कोणाची आहे ?
(1) श्री बा. रानडे
(2) बाळ फोंडके
(3) जयंत नारळीकर
(4) निरंजन घाटे
64. पुढीलपैकी कोणते नियतकालिक दलित साहित्याच्या चळवळीतील महत्वाचे नियतकालिक आहे ?
(1) वनिताविश्व
(2) मनोरमा
(3) आर्यगृहिणी
(4) अस्मितादर्श
65. 'कळ्यांचे निःश्वास, हिंदोळयावर' या मध्यमवर्गीय स्त्रीच्या संदर्भातील जाचक प्रश्न समाजापुढे मांडणा-या बदुचर्चित कादंबऱ्या ------- यांनी लिहिल्या.
(1) गिरीजाबाई केळकर(2) विभावरी शिरूरकर
(3) गीता साने
(4) प्रेभा कंटक
66. महानगरातील झोपडीपट्टी आणि तिथे रहाणाऱ्या माणसांच्या वासना विकारांचे व महानगरातील त्यांच्या ससेहोलपटीचे चित्रण करणारी 'चक्र' ही कादंबरी ------ यांची आहे.
(1) उध्दव शेळके
(2) नयवंत दळवी
(3) भालचंद्र नेमाडे
(4) मनोहर तल्हार
67. 1933 साली प्रसिद्ध झालेला 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा भारतीय पातळीवर अस्पृश्यता उच्चाटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला ग्रंथ ------------ यांनी लिहिला.
(1) गोपाळ गणेश आगरकर
(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(3) विठ्ठल रामजी शिंदे
(4) म. फुले
(3) विठ्ठल रामजी शिंदे
(4) म. फुले
68. बाबासाहेब आंबेडकरांनी ------------- या वृत्तपत्रातून तळागाळातील लोकांच्या वेदनाना वाचा फोडली.
(1) सुधारक
(2) दीनबंधू
(3) सुबोध
(4) मूकनायक
69. बिरसा मुंडांचा आदिवासींच्या हक्कासाठीचा उठाव -------- या नावाने ओळखला जातो.
(1) हूल
(2) उलगुलान
(3) विद्रोह
(4) धिंग
70. --------- यांच्या कवितेत शेतकरी जीवनाचे परिपूर्ण चित्रण दिसते.
(1) संत जनाबाई
(2) संत बहिणाबाई
(3) कान्होपात्रा
(4) बहिणाबाई चौधरी
71. 'रीतिरात्माकाव्यस्य' असे म्हटले आहे?
(1) भरत
(2) भामह
(3) वामन
(4) जगन्नाथ
72. प्रतिभा ही 'नैसर्गिकी' व 'पूर्ववासनागुणानुबन्धि' या प्रकारची असते असे कोणाचे मत आहे ?
(1) अभिनवगुप्त
(2) भरत
(3) दण्डी
(4) वामन
73. साहित्याच्या प्रयोजनात 'ध्वनीविचार' कोणी मांडला आहे?
(1) आनंदवर्धन
(2) वामन
(3) भामह
(4) कुंतक
74. तंत्र, कसब, कौशल्य म्हणजे प्रतिभा नव्हे, नावीण्य, आगळेपणा हा प्रतिभेचा व प्रतिभानिर्मित गोष्टींचा गुणधर्म आहे?
(1) वरील विधान पूर्ण बरोबर आहे.
(2) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे आणि उत्तरार्ध चूक आहे.
(3) वरील विधानातील पूर्वार्ध चूक आहे आणि उत्तरार्ध बरोबर आहे.
(4) वरील विधान पूर्ण चूक आहे.
75. साहित्यातून उच्चतर आनंद मिळतो त्याला 'निरभिलाष आनंद' म्हणतात ही संकल्पना कोणी मांडली आहे ?
(1) प्लेटो
(2) कांट
(3) हेगेल
(4) नित्शे
76. 'प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप' या ग्रंथाच्या लेखकाचे नाव काय आहे?
(1) ल. रा. पांगारकर
(2) वि. ल. भाने
(3) ह. श्री. शेणोलीकर
(4) ल. रा. नसिराबादकर
77. 'महात्मा पंथ' ही संज्ञा कोणत्या संप्रदायासाठी वापरती जाते ?
(1) नाथ संप्रदाय
(3) वारकरी संप्रदाय
(2) महानुभाव संप्रदाय
(4) दत्त संप्रदाय
78. श्रुती, स्मृती, वृद्धाचार, मार्गरूढी, व वर्तमान असे पंचविभागात्मक वर्गीकरण कोणत्या संप्रदायाच्या साहित्याचे केले आहे?
(1) समर्थ संप्रदाय
(2) जैन संप्रदाय
(3) वारकरी संप्रदाय
(4) महानुभाव संप्रदाय
79. संत एकनाथांनी लिहिलेल्या पहिल्या टीकाग्रंथाचे नाव काय आहे ?
(1) एकनाथी भागवत
(2) रूक्मिणी स्वयंवर
(3) भावार्थ रामायण
(4) चतुःश्लोकी भागवत
80. 'गुरूमार्ग' असे कोणत्या संप्रदायाचे नाव आहे ?
(1) वारकरी संप्रदाय
(2) दत्त संप्रदाय
(3) सूफी संप्रदाय
(4) समर्थ संप्रदाय
81. लावणी या काव्यप्रकाराचा सुवर्णकाल कोणता ?
(1) उत्तर पेशवाई
(2) शिवकाळ
(3) यादवकाळ
(4) चालुक्य
82. विराणी हा रचनाप्रकार कोणत्या काव्यप्रकाराशी नाते सांगतो ?
(1) ओवी
(2) गौळण
(3) भारूउ
(4) लावणी
83. मध्यमवर्गाच्या उदयाशी कोणत्या साहित्यप्रकाराचे घनिष्ठ नाते आहे?
(1) नाटक
(2) खंडकाव्य
(3) कादंबरी
(4) लावणी
84. पुढीलपैकी कोणत्या लेखकाने दीर्घकथा या साहित्यप्रकारात लेखन केले आहे?
(1) व्यंकटेश माडगुळकर
(2) शंकर पाटील
(3) जी. ए. कुलकर्णी
(4) चारूता सागर
85. मराठीत आदिबंधात्मक समीक्षा प्रामुख्याने कोणी केली आहे ?
(1) शरद नावरे
(2) म. सु. पाटील
(3) गो. म. कुलकर्णी
(4) शरद पाटील
86. 'मराठी समीक्षेची वाटचाल' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत ?
(1) व. दि. कुलकर्णी
(2) द. मि. कुलकर्णी
(3) मो. म. कुलकर्णी
(4) रा. भा. पाटणकर.
87. 'कवितेचा शोध' हा काव्यप्रकार विषयक साधकबाधक चर्चा करणारा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
(1) वसंत पाटणकर
(2) रा. भा. पाटणकर
(3) वसंत आबाजी डहाके
(4) प्रभा गणोरकर
88. अडोर्नोची तारकासमूह व प्रेरणाक्षेत्र ही दोन्ही रूपके --------- या साहित्यप्रकाराच्या संदर्भात महत्त्वाची आहेत अशी भूमिका हरिश्चंद्र थोरात यांनी मांडली आहे.
(1) कथा
(2) कविता
(3) दीर्घकथा
(4) कादंबरी
89. मराठीत साहित्याचे 'पायाभूत करार' सर्वप्रथम ---------- यांनी मांडले आहेत.
(1) स. गं. मालशे
(2) रा. भा. पाटणकर
(3) मिलिंद मालशे
(4) अशोक जोशी
90. द्विध्रुवात्मकतेचा सिद्धान्त कोणी मांडला आहे?
(1) दिगंबर पाध्ये
(2) मिलिंद मालशे
(3) रा. भा. पाटणकर
(4) मे. पुं. रेगे.
91. 'माणूस आता हाय तर मागनं न्हाई अशातली गत झालीया. काय ऐकायचं आणि काय!' -- हे तात्या देसाई या व्यक्तिरेखेंचे म्हणणे शंकर पाटील याच्या 'वळीव' कथासंग्रहातील कोणत्या कथेत आले आहे ?
(1) वळीव
(2) शाळा
(3) सूड
(4) माहेर
92. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे, असा विचार कोणत्या ग्रंथात आला आहे?
(1) सभासद बखर
(2) आज्ञापत्र
(3) लीळा चरित्र
(4) शिवाजीचा पवाडा.
93. 'कोठे मी तुझा धरू गेले संग। लावियेले जग माझ्या पाठी' ही गोळण कोणाची आहे ?
(1) संत तुकाराम
(2) संत एकनाथ
(3) संत निळोबा
(4) संत ज्ञानवेद.
94. 'व्यंकाजी राजे आपले धाकटे बंधू आहेत. मूलबुद्धी केली त्यांस तोही. आपला भाऊ, त्यांस रक्षणे, त्याचें राज्य बुडवू नका' -- असे विधान कोणत्या ग्रंथातील आहे ?
(1) आज्ञापत्र
(2) महिकावतीची बखर
(3) सभासदाची बखर
(4) राक्षसातागडीची बखर.
95. 'कोण म्हणतं टक्का दिला' या नाटकातील नाट्य निर्मितीचे बीज समता विनिमय केंद्राच्या अध्यादेशात असून हा अध्यादेश तत्कालीन महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिवेशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका अशासकीय संस्थेने काढला आहे?
(1) विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक
(2) विधानाचा पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर.
(3) संपूर्ण विधान बरोबर
(4) संपूर्ण विधान चूक
96. 'अगोचरही वास्तवच असतं' ही भूमिका जयंत पवार यांनी कोणत्या कथासंग्रहात मांडली आहे ?
(1) फिनिक्सच्या राखेतून उठला मोर
(2) मोरी निंद नसानी होय.
(3) लेखकाचा मृत्यु आणि हार गोष्टी
(4) वरणभातलोन्वा नि कोन नाय कोन्चा.
97. माणूस पराभूत झाला तरी माणुसकी नष्ट होत नाही, हे 'माणूस' या कादंबरीचे आशयसूत्र असून ही कादंबरी उद्धव शेळके यांनी लिहिली आहे.
(1) विधानाचा पूर्वार्ध बरोबर उत्तरार्द्ध चूक
(2) विधानाचा पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर.
(3) संपूर्ण विधान चूक.
(4) संपूर्ण विधान बरोबर.
98. '.... काव्यातून मुलांच्या डोळयापुढं बुद्ध भीमाचं चित्र उभं केलं पाहिजे. सगळ्या कार्यक्रमातून बुद्ध भीमच दिसले पाहिजेत. बुद्धाची तत्त्वं मुलांच्या गळी उतरवली पाहिजेत ....' अशी अपेक्षा कोणत्या आत्मकथनात आली आहे ?
(1) जिणं आमुचं
(2) मला उध्वस्त व्हायचंय.
(3) आयदान
(4) तीन दगडांची चूल
99. कारखान्यापुढे केळी विकणारी यमुना म्हातारी संतापून प्रताप पांडे या उत्तरप्रदेशीय ब्राह्मणाला धमकावत होती. तिची क्रोधाने जळजळती झालेली नजर कधी प्रताप पांडेच्या हजार व्याधिव्यसनांनी किडलेल्या शरीरावर तर कधी बाजूला बसलेल्या आपल्या सुंदर सुनेच्या रसरशीत शरीरावर फिरत होती हा प्रसंग बाबुराव बागुल यांच्या कोणत्या कथेतील आहे ?
(1) काळोखाचे कैदी
(2) बोव्हाडा.
(3) स्पर्धा
(4) पेसूक
100. संत तुकाराम यांच्या चरित्रावर आधारित दि बा. मोकाशी यांची कलाकृती कोणती ?
(1) आनंदओवरी
(2) जरा जाऊन येतो
(3) वात्सायन
(4) स्थळ-यात्रा
-